raigad fort information in marathi | रायगड किल्ला माहिती

mahainfo.co.in

Raigad killa

रायगड बद्दल | raigad information in marathi | history of raigad fort

रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगांमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला सन 1674 मध्ये मराठा सम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केले . समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला तीनही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेला आहे . किल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे 1737 पायऱ्या आहेत . तसेच किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेचा वापर करून अवघ्या चार मिनिटात पोहोचता येते हा किल्ला मराठ्यांसाठी अतिशय अभिमानाचा आणि शौर्याची आठवण करून देणारा आहे . रायगड हे केवळ पर्यटन स्थळ नसून छत्रपती शिवाजी महाराजांनी जपलेल्या हिंदवी स्वराज्याचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे .

रायगड किल्ला ताब्यात घेतल्यानंतर महाराजांनी जीर्णोद्धार करून त्याचे नाव मराठा राज्याची राजधानी ठेवले . या किल्ल्यावर नगारखाना दरवाजा , मेणा दरवाजा , महा दरवाजा आणि पालखी दरवाजा असे अनेक आकर्षक दरवाजे आहेत . मुख्य बाजार मार्गाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा होता जो समोर महाराजांच्या आणि त्यांच्या प्रिय कुत्र्याच्या समाधिकडे घेऊन जातो .

रायगडावर ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय उत्साहात साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्रातून या दिवशी शिवभक्त येतात आणि मोठ्या आनंदात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करतात raigad information in marathi

रायगड ला कशे जायचे | how to reach raigad | trek to raigad fort

रायगडावर जाण्यासाठी आपण विमान , रेल्वे , बस , स्वतःची गाडी घेऊन सुद्धा जाऊ शकता . तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल तर पुणे आणि मुंबई हे दोन जवळचे विमानतळ आहेत . तुम्ही रेल्वे मार्गाने मुंबई , पुणे , पनवेल , ह्या मुख्य ठिकाणाहून पोहोचू शकता . बस ने किंवा स्वतःची गाडी असेल तर msrtc बस उपलब्ध आहेत . रायगड हा सायन पनवेल एक्सप्रेसने जोडलेली आहेत . मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या रस्त्याने पोहोचू शकता .

केव्हा जायचे | time to visit raigad | raigad fort

रायगडावर वर्षभरात केव्हाही जाऊ शकता . रायगडावर जाण्याची वेळ सकाळी ०८ वाजेपासून तर सायंकाळी ०६ वाजेपर्यंत असते . किल्ला चढण्यासाठी सुमारे ०३ तास लागतात . प्रवेस फिस भारतीयांसाठी १० रुपये तर विदेशी नागरिकांसाठी १०० रुपये आहे