Best places to visit in pune maharastra पुणे शहरात पाहण्यासारखी ठिकाणे

mahainfo.co.in

pune पुणे

पुणे हे भारतातील सातवे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. पुणे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागातमुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे . नागरी सोईसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात. तसेच मिसळ हा पुण्याचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधीपासून या शहराला इतिहास लाभलेला आहे. या शहराला समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेला आहे. पुणे शहरात मराठी ही मुख्य भाषा बोलली जाते . पुणे शहरात लाल महल , तुळशीबाग , शनिवारवाडा , विश्रामबाग वाडा, चतुशृंगी मंदिर, महादजी शिंद्याची छत्री इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.सर्वांनी भेट द्यावीत अशी ठिकाणे आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.

1. shaniwarwada pune | शनिवारवाडा पुणे

पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 13 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवारवाडयाची रचना करण्यात आलेली आहे.

2.lal mahal pune | लाल महाल पुणे

लाल महाल ही छोटीशी वास्तू पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे. ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर आहे. लाल महालच्या समोरच पुण्यातील अतिशय गजबजलेला असा शिवाजी रोड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण लाल महालातच गेले. 

3. tulshibagh pune | तुळशीबाग पुणे

तुळशीबाग म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्याची पारंपरिक बाजारपेठ आहे. स्वयंपाकघरातील वस्तूंपासून, कपडे, सौंदर्यप्रसाधने, खेळणी, लहान मुलींची भातुकलीची खेळणी असे सर्व काही इथे मिळते. १८ व्या शतकात इथे आंबील ओढ्याच्या काठी सरदार खासगीवाल्यांची तुळशीची बाग होती. त्या काळात खासगीवाल्यांचा वाडा आणि बाग ही पुण्याची दक्षिण सीमा होती.

4. विश्राम बाग

स. १८१८ साली पुण्याचा पाडाव होईपर्यंत ११ वर्षे दुसऱ्या बाजीरावाचे येथे वास्तव्य होते. सुमारे २०,००० वर्ग फूट क्षेत्रफळाच्या या वाड्याचा बहुतांश भाग टिकला आहे. या वाड्यात सध्या टपाल कार्यालय, नगरपालिकेच्या काही कचेऱ्या व मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे.

5. महादाजी शिंदेंची छत्री

शिंद्यांची छत्री हे महाराष्ट्राच्या पुणे शहराजवळील वानवडी येथे बहिरोबा नाल्याच्या काठावर असलेले स्मारक आहे. हे स्मारक इ. स. च्या १८व्या शतकातील मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी सेनानी, महादजी शिंदे यांच्या स्मृत्यर्थ बांधले गेले आहे.

6. चतुशृंगी मंदिर

चतुःशृंगी म्हणजे चार शिखर असलेला पर्वत. चट्टुशृंगी मंदिर ९० फूट उंच आणि १२५ फूट रुंद आहे आणि हे सामर्थ्य आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहे. चतुःशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी १७०हून अधिक पायऱ्या चढणे आवश्यक आहे. मंदिराच्या आवारात दुर्गा आणि भगवान गणेश यांचीही मंदिरे आहेत.

7. भिडे वाडा

भिडेवाडा ही पुण्यातील २५७ बुधवार पेठ येथील ऐतिहासिक वास्तू आहे. या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. यात शिक्षण देण्याचं काम त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी केले.

8. श्री. संत तुकाराम महाराज मंदिर

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या महाराष्ट्रात भक्तीचे मळे पिकवले तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर आहे.

9. संत . ज्ञानेश्वर महाराज समाधी

स. १२९६ ला संजीवन समाधी घेणाऱ्या ज्ञानोबा माऊलींची कर्मभूमी म्हणजे ‘देवाची आळंदी’ हे गाव होय. या आळंदी गावाला ‘देवाची आळंदी’ असे म्हणतात कारण चोराची आळंदी आणि म्हसोबाची आळंदी नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत. पुण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर देवाची आळंदी आहे.

पुणे शहाराजवळ काही टेकड्या आहेत ,भरपूर मंदिरे देखील आहेत जेथे तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता काही बागा ही आहेत जेथे जेल आवडेल तुम्हाला

pune whether | पुण्याचे हवामान

  • पावसाळा 20 ते 30
  • हिवाळा 10 ते 30
  • उन्हाळा 30 ते 40

how to reach pune कसे जायचे

पुणे ला येण्यासाठी तुम्ही बाय रोड बस,कार ,टू व्हीलर ने सांभाजीनगर ,अहमदनगर मुंबई या कोणत्याही मार्गाने जाऊ शकता .

विमानाने यायला या शहरात इंटरनॅशनल एयरपोर्ट आहे तुम्ही भारताच्या कोणत्याही विमानतळावरून येऊ शकता

ट्रेन ने सुद्धा पोहोचत येते

Leave a comment